आदिवासी बहुल क्षेत्रात गुजरात सीमेलगत कळवण,पेठ,हरसूल,सुरगाणा,जव्हार,मोखाडा इत्यादी तालूक्यात आखातीचा सण हा मोठया उत्साहात साजरा केला जातो.
----काय आहे परंपरा----
आखाती सणाच्या सात किंव्हा नऊ दिवस अगोदर बांबूपासून विणलेल्या व शेणाने सारवलेल्या एका लहान टोपली(दुरडी) मध्ये माती घेऊन त्यात पाच प्रकारचे धान्य पेरले जाते.यात भात,नागली,मका,वरी,उडीद इत्यादी धान्याचा समावेश केला जातो.धान्य पेरलेल्या टोपलीला "गौर" किंवा "गौराई"असे म्हणतात. त्यानंतर पेरलेल्या धान्याला पाणी शिंपडतात.या गौराईला सूर्यप्रकाश व हवा लागू नये म्हणून घरातील एका कोपऱ्यात मोठ्या टोपली (झिला) खाली झाकूण ठेवतात,म्हणजे रोप हिरवी न होता,पिवळ्या रंगाची होतात.पुढील सात ते नऊ दिवस गौराईला सकाळ-संध्याकाळ पाणी घातले जाते.या दरम्यान रात्रीच्या वेळी महिला "गौराईची गाणी"म्हणतात.
----गौराईची मिरवणूक----
आखाती सणाच्या दिवसी मिरवणूक काढण्यात येते.तीन-चार वाज्याच्या सुमारास वृद्ध महिला व मुली आप आपल्या घरी उगवलेल्या गौराईला कागदी गजरा लावून सजवतात. नैवैद्य दाखवून पूजा करतात,नंतर गौराईला उचलून डोक्यावर घेऊन घराबाहेर येतात.सतत झाकूण ठेवल्यामूळे टोपलीतल्या रोपाला 'पिवळा रंग' प्राप्त झालेला असतो.
गावातील मंदिरात किंवा गावच्या पाटिलच्या घरी संपुर्ण गावातील महिला गौराईला घेऊन एकत्र येतात.मोकळ्या जागेत गौराई खाली ठेवून तीच्या भोवती गोल रिंगण धरुण'कोडई' झाडाच्या काठीपासून बनवलेल्या 'टिपरी' घेऊन गौराईची गाणी म्हणत नाचतात.नंतर पारंपारिक वादय "संबळ"(सांबळ्या,कहाळी) यांच्यासंगे नाचत-नाचत मिरवणूक पूढे चालते.
गौराईला गावाजवळील नदी,तलाव किंवा विहिरीवर नेतात.तिथे पूजा करून उगवलेली गौर (पिवळी रोप) आर्धी तोडून घेतात व बाकीची गौर खाली माती-मूळांचा भाग पाण्यात बुडवून विसर्जन करतात.तोडलेली गौर थोडीशी देवाल अर्पण करुन बाकी उरलेली गौर महिला आपल्या केसात माळतात.
आखाती सणाला नवविवाहीत मूली सासरहून माहेरी येत असतात.हा सण शेवटचा असल्यामूळे या सणाला "बूडीत सण"असे ही म्हणतात.
----तापर्य----
पेरलेल्या धान्यापासून उगवलेल रोप हे योग्य आहे कि कमजोर आहे,याचे परिक्षण आदिवासी बांधव करतात.म्हणजे येणाऱ्या पुढील पावसाळ्यात हे पीक शेतात कस येणार याचा अंदाज आदिवासी शेतकरी बांधव लावत असतो.

संकलन : सुशिल म कुवर
![]() |
| फोटो प्रतिकात्मक आहे आवर्जून शेअर करू शकता. |

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा